पुनावळे रावेत परिसरात पसरले धुके
पिंपरी-चिंचवड , पुनावळे
पिंपरी-चिंचवड शहरातील किवळे, रावेत, विकास नगर, भागात तसेच पुनवळे मध्ये आज सकाळी मोठ्या प्रमाणात धुके पसरले होते रस्त्यावर धुके पसरल्याने सगळीकडे थंडमय नैसर्गिक वातावरण निर्माण झाले, या धुक्यात येणाऱ्या वाहतुकीला अडचण निर्माण होत होती, साधे रस्तेही नीटपणे दिसत नव्हते, परंतु हे नैसर्गिक सौंदर्य पाहण्याचाही मजा ही येत होती, शहरात काही दिवसापासून कडाक्याची थंडी वाढली आहे या थंडीमुळे नागरिक स्वेटर ,मफलर, कानटोपी वापरून रस्त्यावर फिरताना दिसत आहेत, यातच आज या परिसरात पसरलेल्या धुकेमुळे एक वेगळाच अनुभव पुनावळे, रावेत, किवळे परिसरातील नागरिकांना येत होता. नैसर्गिक सौंदर्य काय असते हे या मुळे नागरिकांना पहावयास मिळाले.
Advertisement
ते
Advertisement