वर्ल्ड कपविजेत्या खेळाडूंना भेटण्याची मिळणार संधी
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१७ डिसेंबर) :- दृष्टी नसतानादेखील क्रिकेटमध्ये आपल्या उत्कृष्ठ खेळाच्या माध्यमातून वर्ल्ड कप जिंकून जगज्जेते झालेल्या दिव्यांग खेळाडूंना भेटण्याची नामी संधी क्रिकेटचाहत्यांना मिळाली आहे.
चिंचवडच्या एम्पायर इस्टेट प्रिमियर लीगचे आयोजन १६ ते १९ डिसेंबर दरम्यान केले आहे. चिंचवड येथील एम्पायर इस्टेट गेट नंबर १० येथील मांजरी देवी मंदिर येथे लीगचे आयोजन केले आहे. युवानेते आकाश चतुर्वेदी यांनी आयोजित केलेल्या प्रिमियर लीगमध्ये वर्ल्ड कप विजेत्या दिव्यांग(अंध) खेळाडूंना भेटण्याची संधी नागरिकांना मिळाली . सोळा डिसेंबर रोजी हे खेळाडू प्रिमीयर लीगमध्ये उपस्थित राहून आपले अमूल्य अनुभव क्रिकेटप्रेमींसमोर कथन केले.
दिव्यांग असूनही देशासाठी खेळून वर्ल्डकप (क्रिकेट) स्पर्धेत विजेते ठरत त्यांनी केलेली कामगिरी अविश्वसनीय ठरली आहे. हे खेळाडू समाजासाठी प्रेरणास्थान आहे. या खेळाडूंना प्रिमियर लीगच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा छोटासा प्रयत्न युवानेते आकाश चतुर्वेदी यांनी केला आहे. या अंध संघाने वर्ल्ड कप चॅम्पियनशिपसाठी भारताचे प्रतिनिधित्व केले ज्यामध्ये ते जगात प्रथम स्थानावर राहिले. त्यांनी भारतासाठी विश्वचषक जिंकला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना फोन करून अभिनंदन आणि स्तुती केली. सचिन तेंडुलकर त्यांना भेटायला आणि अभिनंदन करायला गेले. पण आज त्यांना खायला सुद्धा योग्य अन्न नाही भारताचे भविष्य अशा परिस्थितीतून जात आहे.
आकाश चतुर्वेदी यांनी पुढाकार घेण्यासाठी उचललेले एक चांगले पाऊल आणि या क्रिकेटपटूंना प्रतिभा दाखविण्याची संधी दिली आणि अंध व्यक्तींना जीवनात काहीतरी करू शकतात हे सिद्ध करण्यासाठी कामगिरीसाठी व्यासपीठ दिले. त्यांना पुन्हा व्यासपीठ दिल्याबद्दल आकाश चतुर्वेदी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या एइपीएल (एम्पायर इस्टेट प्रिमियर लीग) स्पर्धेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
इम्पायर इस्टेटचे जेष्टनागरिक बाळा आप्पा वाघेरे, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी , डॉ.अमित कामत , जितेंद्र दातीर पाटील आदी उपस्थित होते .