शबनम न्यूज : लोणावळा (दि.१७ डिसेंबर) :- कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने राज्यस्तरीय अधिवेशन-2021चे आयोजन दि. 16 व 17 डिसेंबर 2021 रोजी नारायणी धाम लोणावळा येथे आयोजित करण्यात आले होते. दोन दिवसीय अधिवेशनाला महाराष्ट्रातील कुंभार समाज सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी उपमहापौर श्री. प्रभाकर वाघेरे यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली.यावेळी अधिवेशनाचे संयोजक तथा संस्थेचे प्रदेश अध्यक्ष मा.नगरसेवक श्री. सतिश दरेकर यावेळी लोणावळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रीमती सुरेखाताई जाधव तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
माजी विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे व माजी उपमहापौर श्री. प्रभाकर वाघेरे यांनी नारायणी धाम येथील गोशाळेस भेट देऊन तेथील गायांची व तेथील व्यवस्थापनाची पाहणी केली.