राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दर्जेदार नाटकांचे सादरीकरण
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१९ डिसेंबर) :- लोकनेते शरद पवार साहेब यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे उद्घाटन दि. 8 ऑगस्ट 1996 ला करण्यात आले होते. या संस्थेचे हे रौप्यमहोत्सवी 25 वे वर्ष आहे. तसेच लोकनेते शरद पवार साहेब यांचा 81 वा वाढदिवस आहे. त्याचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दोन दिवसांचा नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी दि.18 व रविवारी दि.19 डिसेंबर ला हा नाट्य महोत्सव चिंचवड गावातील प्रा. रामकृष्ण प्रेक्षागृह येथे होणार आहे. शनिवारी रात्री 8:30 वाजता ज्येष्ठ कलाकार भरत जाधव यांची ‘मोरुची मावशी‘ आणि रविवारी ‘तु म्हणशील तसं !’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शनिवार (दि.१८ डिसेंबर) रोजी ज्येष्ठ कलाकार भरत जाधव यांची ‘मोरुची मावशी’ हे नाटक प्रा. रामकृष्ण प्रेक्षागृह येथे संपन्न झाले.
या कार्यक्रमाची सुरुवात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर व अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते दीपज्वलन करून करण्यात आले. यानंतर शरद पवार यांचा जीवनप्रवास चित्रफितीद्वारे सादर करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरात पत्रकारिता क्षेत्रात उत्तम प्रकारे काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर भरत जाधव व त्यांची पूर्ण टीम यांनी ‘मोरुची मावशी’ हे नाटक सादर केले. या नाटकाला उपस्थित प्रेक्षकांच्या वतीने प्रचंड प्रतिसाद मिळाला. विनोदी नाटकाने सर्वांची मने जिंकली. सर्वांचंच अभिनय उत्कृष्ट असा होता.
सर्वांनी या मोरूची मावशी या नाटकाचा आनंद लुटला.
तसेच यावेळी टेल्को कलासागर, नृत्य संस्था नंदकिशोर कपोते, रविकांत वरपे कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस ,राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, युवक उपाध्यक्ष विशाल काळभोर उपस्थित होते.
तसेच रविवार या नाट्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दि.१९ डिसेंबर) रोजी तू म्हणशील तसं या सुप्रसिद्ध नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. या हृदयस्पर्शी नाटकाचा आनंद प्रेक्षकांनी लुटला.या कार्यक्रमाची सुरुवात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते दीपज्वलन करून करण्यात आले.
यावेळी पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज भोसले, संकर्षण कराडे, बारामती शाखेचे अध्यक्ष,सुनील महाजन, दौंड शाखेचे अध्यक्ष,प्रमोद कांबळे, शिरूर शाखेचे अध्यक्ष दिपाली शेळके, किरण गुजर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, नगरसेविका गीता मंचरकर राष्ट्रवादी युवती अध्यक्षा वर्षा जगताप, सुहास जोशी, शंकर मराठे उपस्थित होते.या नाटकात संकर्षण कऱ्हाडे व भक्ती देसाई यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाची छाप सोडली. या दिवशी नाट्य परिषदेशी जोडलेल्या व्यक्तींचा सन्मान मान्यवर उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मित्र मंडळ, चिंचवड, वसंतराव देशपांडे मेमो. फौंडेशन, वसंतराव जोशी संस्था (मदन जोशी), कलारंग (अमित गोरखे), नादब्रह्म (घांगुर्डे), अथर्व नाट्य (डॉ. संजीवकुमार), टेल्को कलासागर, नृत्य संस्था (नंदकिशोर कपोते), कर्तव्य फाऊंडेशन (सचिन पटवर्धन), नाट्य सिंधू, कलापिनी, समाधान गुडदे संस्था, थिएटर वर्कशॉप कंपनी, विकासनगर संगीत विद्यालय शिधये संस्था, गुरुकृपा संगीत क्लास (पंडित पंढरीनाथ दरेकर), आकांक्षा इवेंट ऑर्गनायझेशन (तृप्ती धनवटे), आमचे आम्ही संस्था (मनोज डाळींबकर), प्रयोग थिअटर्स संस्था (योगेश दळवी), स्वरसादना संगीत विद्यालय, जटायू कल्चलर अकॅडमी (नितीन सुतार), नृत्य शारदा कला मंदिर (स्नेहल सोमण), कोकरे (मंडप), गवळी (मंडप), रेझोनन्स स्टुडीओ (तेजस चव्हाण), सिनेरियो प्रोडक्शन्स (सूचित गवई) या संस्थांचा आणि सुधाकर चव्हाण (सांगवी), विजय जोशी, उमा खापरे, वैशाली मराठे, राजाभाऊ गोलांडे, धोंडीबा सायकर, मधू जोशी, मंजुश्री दिवाण, पुरुषोत्तम सदाफुले, उद्धव कानडे, स्वाती पाटील, नंदकिशोर तोष्णीवाल, शंतनु गटणे, शंकर मराठे (फोटोग्राफर ), सुभाष चव्हाण (फोटोग्राफर), पाचंगे परिवार, विवेक क्षीरसागर, तेजश्री अडीगे, वैशाली पळसुले, शरद भगत (मेकअप), माऊली काळे (बॅकस्टेज), अतुल पंढरपुरे (साउंड), अनूप कोठावळे (लाइट), फिरोज मुजावर, मनोज कांबळे (साऊंड), मा. आशाताई देशमुख, मा. मीनाक्षीताई आठवले, संगीता लाखे (लावणी), वैशाली मराठे, राम माळी (दिग्दर्शक), आसाराम कसबे या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते उचीत गौरव करण्यात आले आहे.