शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१९ डिसेंबर) :- पिंपरी-चिंचवड मनपाच्या क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघाच्या कु.प्रतीक्षा लांडगे ,श्रावणी सावंत, कीर्ती कडगंची या तीन खेळाडूंची पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या निवड चाचणीद्वारे पुणे येथे झालेल्या शिबिरातून परभणी पाथरी येथे २० ते २२डिसेंबर दरम्यान होणार्या ३२ व्या राज्यस्तरीय किशोर गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा कला विकास प्रकल्प पिंपरी चिंचवड महानगरपालिका संघाने थेरगाव, पिंपरी येथे संपन्न झालेल्या ३२व्या जिल्हास्तर स्पर्धेत विजय संपादन केला होता.
राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होत असलेल्या खेळाडूंचे सुषमा शिंदे सहायक आयुक्त क्रीडा पिं चिं मनपा ,अनिता केदारी (क्रीडा अधिकारी), चंद्रशेखर कदम (मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय थेरगाव ), विश्वास गेंगजे क्रीडा पर्यवेक्षक, रामेश्वर पवार पर्यवेक्षक माध्यमिक विद्यालय थेरगाव यांनी स्वागत करून पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.
सदर खेळाडूंना आटवे बन्सी गंगाराम सर यांनी मार्गदर्शन केले आहे तर श्रीमती सोनाली जाधव यांनी त्यांचे व्यवस्थापन पाहिले आहे.