शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२० डिसेंबर) :- कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महारांच्या पुतळ्याची विटंबना झाली. झालेल्या घटनेबाबत तेथील भाजपचे मुख्यमंत्री यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याऐवजी चुकीचे वक्तव्य केले आहे. यामुळे त्यांचा महाराजांविषयीचा द्वेष समोर आला आहे.
भाजपा फक्त सत्तेपुरते आमचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा दुटप्पीपणा करत नसेल तर कर्नाटकचे मुख्यमंत्री यांचा राजीनामा घ्यावा.
काहि दीवसापूर्वी भाजपचे पदाधिकारी छिंदम याने ही असे वक्तव्य केले होते. या वरून सिद्ध होते की भाजप फक्त सत्ते साठी भारताचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून सत्तेत येण्यास बघतात व त्यांचे पदाधिकारी काही वक्तव्य करत आहे आणि दुसरीकडे पुण्यात काल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे.
या दोन्ही घटना परसपर विरोधी आहेत. यामुळे भाजपने राज्यातील लोकांची दिशाभूल व फसवणूक थांबवावी.छत्रपती शिवाजी महाराजांविषयी खरोखरच प्रेम असेल दोषींवर कडक कारवाई करून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भारतीय राष्ट्रवादी पार्टी चे महासचिव अजित संचेती यांनी भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या कडे केली आहे.