शबनम न्यूज : पुणे (दि.२० डिसेंबर) :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य विचार मंच महाराष्ट्र व पुणे विभाग कमिटी आयोजित जिल्हास्तरीय काव्यवाचन स्पर्धा व निमंत्रित कवी संमेलन दिनांक १९/१२/२०२१ रोजी अप्पर डेपो,बिबवेवाडी,पुणे या ठिकाणी उत्साहात पार पडले.कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय नगरसेविका रूपालीताई धावडे व कविसंमेलनाध्यक्ष श्री.रणजीत पवार सर संत गाडगे महाराज विचार मंचचे संस्थापक होते.स्पर्धेचे परीक्षण श्री. रणजीत पवार सर यांनी केले.प्रमुख उपस्थिती राज्य कमिटीचे आ.सुरेश कुराडे हे होते तसेच पूर्ण पुणे जिल्हा कार्यकारीणी उपस्थित होती.
बहुसंख्येने स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला व उत्साहात कविसंमेलन ही पार पडले ..विजेत्या स्पर्धकांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व रोख बक्षीस देवून गौरविण्यात आले.सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले…यशोदिप पब्लीकेशनचे प्रकाशिका रूपाली ताई उपस्थित होत्या… मानवतेच्या नावानं चांगभलं ही संपूर्ण टीम उपस्थित होती. कविता काळे ताई व वैशाली लांडगे ताई यांनी उत्तम सुत्रसंचालन केले,शुभम चांदणे सर यांनी प्रास्ताविक केले व कांचन मून,प्रतिमा काळे,रेखा फाले,अंजू वरठे,उमा लुकडे,शुभांगी शिंदे,सिताराम नरके,अभिजित पवार,नकुसा लोखंडे यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले…कविता काळे ताईने सर्वांचे आभार मानले.