शबनम न्यूज : औरंगाबाद (दि.२० डिसेंबर) :- औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक गीतकार,संगीतकार कथा पटकथा लेखक “योगेश तुळशीराम मोरे” यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेत गंगापूर येथील सानिका इंडेन गॅस एजन्सीचे मॅनेजर तथा समाजसेवक “मंगेश सुभाषराव कळसकर”यांच्या हस्ते मोरे यांचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला.
सत्काराप्रसंगी समाजसेवक “मंगेश कळसकर” म्हणाले की,सध्याच्या ऑनलाइनच्या युगात वाचन संस्कृती जपवणे अवघड होताना दिसत आहे.यामुळे सर्व संतांची चरित्रे,मराठी वांङ्गमय,धार्मिक साहित्य जपवण्यासाठी वाचन संस्कृती जपवणे गरजेचे आहे;यासाठी सर्व ज्येष्ठ व नवोदित साहित्यिकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.अशी चर्चा कळसकर यांनी मराठी साहित्यिक “योगेश मोरे” यांच्याशी केली.तसेच मोरे यांनी लिहिलेल्या भरकटलेल्या “पक्ष्याचा किलबिलाट” या कादंबरीचे देखील समाजसेवक मंगेश कळसकर यांनी कौतुक करून अभिनंदन केले.