शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२० डिसेंबर) :- दिव्यांगांची सेवा हीच श्रेष्ठ मानवसेवा असुन समाजाने दिव्यांगाप्रती असलेली जबाबदारी निस्पृहपणे पार पाडावी असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
झुंज दिव्यांग संस्थेच्या वतीने चिखली येथे दिव्यांग व्यक्तींच्या आंतरजातीय सामुहिक विवाह सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी उपस्थित राहुन नवदाम्पत्यास वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. या विवाह सोहळ्यामध्ये सहा विवाह संपन्न झाले.
यावेळी झुंज दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजु हिरवे, भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह विविध मान्यवर आणि दिव्यांग दाम्पत्यांचे निकटवर्तीय उपस्थित होते. महापालिकेचे वतीने सुरु करण्यात आलेल्या दिव्यांगांच्या विविध योजनांचा लाभ संबंधित लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन देखील महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी यावेळी केले.