शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२१ डिसेंबर) :- पिंपरी चिंचवड मधील एम्पायर स्टेट प्रीमियर लीगचे आयोजन युवा नेते आकाश चतुर्वेदी यांच्या वतीने दिनांक 16 ते 19 डिसेंबर दरम्यान करण्यात आले. चिंचवड येथील एम्पायर इस्टेट गेट नंबर 10 येथील मांजरी देवी मंदिर येथे या लीगचे आयोजन करण्यात आले होते. आकाश चतुर्वेदी यांनी आयोजित केलेल्या प्रीमियर लीग मध्ये वर्ल्ड कप विजेते दिव्यांग खेळाडूं मध्ये खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ नुकतेच संपन्न झाले.
या बक्षीस वितरण समारंभामध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या टीमला वीस हजार रुपये रोख रक्कम देण्यात आली, तसेच दुसऱ्या क्रमांकाच्या टीमला दहा हजार रुपये रोख रक्कम म्हणून देण्यात आली, त्याचप्रमाणे सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. या बक्षीस वितरण समारंभामध्ये वरळीचे शिवसेनेचे आमदार सचिन आहेर तसेच पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन भोसले, बाळा अप्पा वाघेरे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी उपमहापौर नगरसेवक तुषार हिंगे, प्रभाग अध्यक्ष व नगरसेवक शैलेश मोरे, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, श्याम भाऊ शिंदे, सिद्धार्थ बनसोडे आणि आदी मान्यवर या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एम्पायर स्टेट मधील ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते,या सर्व उपस्थितांचे युवा नेते आकाश चतुर्वेदी यांनी आभार व्यक्त केले.