शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२२डिसेंबर) :- निगडी प्राधिकरण, पुणे-४४, येथील सुप्रसिद्ध कवयित्री,लेखिका,शिक्षिका सौ.प्रतिमा अरुण काळे यांना ‘राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार’ नुकताच ‘ विठ्ठल इन सभागृह,पंढरपूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
गीता जयंती व मोक्षदा एकादशीच्या पार्श्वभूमीवर ‘विठ्ठल इन सभागृह,पंढरपूर येथे कै.काशीबाई यादवराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हिरकणी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,जालना अध्यक्षा आणि हिरकणी साहित्यगौरव समुहप्रवर्तक मा. वनमाला पाटील (माई) यांनी ई. सन २०२१चे हिरकणी पुरस्काराचे आयोजन केले होते. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयातील निवडक महिलांना पूरस्कार जाहिर करण्यात आले होते, त्यात पुणे जिल्हयातून सौ.प्रतिमा अरुण काळे यांची निवड करून उत्कृष्ट साहित्यसेवा सन्मानार्थ राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आम्ही पडद्याआड चाललो आणि ‘कथा ललितांच्या फांद्या,मी प्रतिमा माझी प्रतिमा,भगवदगीता अहिराणी भाषेतून इत्यादी विविध पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.यामध्ये सौ.प्रतिमा अरुण काळे यांचा सहभाग होता.
या कार्यक्रमाला आयोजक मा वनमालाताई पाटील, विश्वविक्रम कवि मा. रवि सोनार सर,औसेकर महाराज, सुप्रसिद्ध कवयित्री स्नेहल पाठक मार्केण्डेय संस्था अध्यक्षा मा.अनुराधा गुंडेवार मा.प्रकाशक प्रवीण भाकरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती सन्मानाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.