शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.२३ डिसेंबर) :- भोसरी येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने डायनोमर्क कंट्रोल्स या आस्थापनेत 140 कामगारांना जेष्ट समाजप्रबोधनकार शारदाताई मुडे यांच्या एकपात्री “आईच्या काळजातुन”या प्रयोगातून आईचे आपल्या जिवनातील स्थान व तीने संसारात घेतलेली त्यागाची भुमिका सांगत आसतांना सर्व कामगार आपल्या डोळ्यातून आश्रुंना वाट मोकळी करून देत होते.
आई विना तिन्ही जगाचा भिकारी असे म्हणत आईचे महत्त्व सांगत होत्या.आई म्हणजे मायेने भरलेला कळस ,मायेने विसावा देणारी सावली, हजार जन्म घेतले तरी तीचे उपकार फिटणार नाहीत,तीने अनमोल जन्म दिला ला ग बाई,तुझे उपकार फिटणार नाहीत.
आई माझ्या मायेचा सागर, तीने दिला जीवनाला आकार असे म्हणत स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून आपल्या मुलांच्या स्वप्ने पुर्ण करण्यासाठी दिवसभर कष्ट करते ती आई.आपल्या संसारासाठी, पतीसाठी,मुलासाठी झिझते ती आई,हे ऐकताना प्रत्येक कामगार आश्रू ढाळत होता आपल्या अश्रूंना वाट करून देत होते.
व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत. म्हणाले की आई वडील आपलै दैवत आहेत .मी माझ्या उद्योगाच्या समोरच आई श्रीमती नलिनी राउत यांच्या नावे कुलर बसवून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी पाणपोई केली आहे तुम्ही माझ्या आईच्या आठवणीना आज उजाळा दिला असे राऊत म्हणाले.
संचालिका अमिता राऊत यांनी सांगितले की सर्व काही करा पण आईवडिलांना विसरू नका.
गुणवंत कामगार आण्णा जोगदंड म्हणाले की आई वडीलाची सेवा कशी करावी ते राऊत कुटुंब ज्वलंत उदाहरण आहे. आमची आस्थापना वर्षभर कामगारांना ऊपयुक्त उपक्रम राबवीत आसते.येऊ घोतलेले 31 डिसेंबर संदर्भात जोगदंड म्हणाले की नवीन वर्षाची सुरवात व वर्षाचा शेवट आई वडिलांच्या,व गरुजनांच्या आशीर्वादाने करा,ब्रिटिश संस्कृतीचे अनूकरण न करता भारतीय संस्कृती चे अनूकरण करण्याचे आव्हान जोगदंड यांनी केले.
मानव संसाधन प्रमुख सुर्यकांत मुळे आई वडीलाची सेवा करा त्याच बरोबरच काम करत आसताना सुरक्षितेला महत्त्व देण्यास सांगितले.आणि नवीन आपल्या देशातव शहरात शिरकाव झालेल्या ओमिक्राँन (व्हेरीएंट )बद्दल आपण सर्वांनी जागरूक राहून शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करण्याचे आव्हान केले.
यावेळी मुख्यकार्यकारी आधिकारी प्रकाश अभ्यंकर म्हणाले की आजचे प्रभोधन काळजाला भिडणारे होते. मला माझ्या आईने माझ्या साठी घेतलेले अपार कष्ट आठवले मी आज आईच्या मुळे व्ही.पी पदापर्यंत पोहचलो आहे.
यावेळी चिंचवड कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक प्रदिप बोरसे यांनी मंडळाच्या कामगारासाठी असणाऱ्या शासकीय उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत, संचालिका सौ अमिता राऊत,व्ही.पी.प्रकाश अभ्यंकर गुणवंत कामगार आण्णा जोगदंड, मानवसंसाधन प्रमुख सुर्यकांत मुळे,चिंचवड कामगार कल्याण केंद्र संचालक प्रदिप बोरसे, पिंपरी केंद्र संचालक सुरेश पवार ,विभाग प्रमुख अक्षरा राऊत, प्रविण बाराथे,केतकी राऊतहेमंत नेमाडे, राजेश वैद्य,केतकी राऊत, रवी भेंनकी ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.