शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.२३ डिसेंबर) :- तब्बल पावणे दोन वर्षापासून घरात चालु असलेले ऑनलाइन शिक्षण आता शाळेतील वर्गात येऊन सुरु होणार, यासाठी अधिरा इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी, आरोग्याच्या खबरदारीसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
शाळा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना व पालकांना खबरदारीच्या सूचना शाळेच्या वतीने देण्यात आल्या, पालकाकडून लेखी संमतीपत्र घेण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांचे लेखी संमती पत्र नाही, अशा विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाही, अशा स्पष्ट सूचना शाळेचे प्राचार्य सुनिता फडके मॅडम यांनी दिल्या आहेत.
अधिरा इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष मा.श्री नवनाथ ढवळे सर व शाळेच्या प्राचार्य मा. सुनीता फडके मॅडम हे स्वतः विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ उभे होते. विद्यार्थ्यांचे सनईवादनासह फेटे बांधून हार्दिक स्वागत करण्यात आले. शाळा सुरू करण्यापूर्वी संपूर्ण शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. विद्यार्थी शाळेत येणाऱ्या साठी शाळेच्या गेट जवळ विशिष्ट अंतर ठेवून चौकोनाची आखणी करून यामध्ये विद्यार्थी उभे राहतील व त्यांच्या शरीराचे तापमान मोजणी करून वर्गात प्रवेश दिला जाईल तसेच प्रत्येक वर्गात बाकामध्ये ठराविक अंतर ठेवून आसन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच निर्जंतुकीकरणासाठी प्रत्येक वर्गात सॅनिटायझर ची बॉटल ठेवण्यात आली आहे. विद्यार्थी खूप दिवसांनी शाळेत येणार यासाठी दिशादर्शक तक्ते लावले आहे. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा यासाठी प्रत्येक वर्ग शिक्षकांनी वर्गामध्ये सजावट केली आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी शिक्षण चालू असणार आहे. ऑफलाइन पद्धतीने शाळा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.