जे.डी. ग्रुप वतीने अकॅडमीचे अभिनंदन
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.२३ डिसेंबर) :- पिंपरी-चिंचवड शहरातील आमदार लक्ष्मण भाऊ जगताप कला-क्रीडा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी एस.आर.अल्टिमेट बॉक्सिंग अकॅडमी अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. सदर स्पर्धा जिल्हास्तरावर घेण्यात आली. या स्पर्धेत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप कला क्रीडा अकॅडमीच्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकाविला.
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंमध्ये प्रयोग देविदास राजपूत (स्पर्धा – डिस्ट्रिक लेवल बॉक्सिंग कॉम्पिटिशन , प्रथम क्रमांक),करुणा प्रशांत जगताप ( स्पर्धा – डिस्ट्रिक लेवल बॉक्सिंग कॉम्पिटिशन , प्रथम क्रमांक) , आर्या सचिन गराडे (स्पर्धा – डिस्ट्रिक लेवल बॉक्सिंग कॉम्पिटिशन , प्रथम क्रमांक), श्रेया प्रशांत भंगी ( स्पर्धा – डिस्ट्रिक लेवल बॉक्सिंग कॉम्पिटिशन , प्रथम क्रमांक ) , अंशुल खेले ( स्पर्धा – डिस्ट्रिक लेवल बॉक्सिंग कॉम्पिटिशन , प्रथम क्रमांक), यांनी विशेष कामगिरी करत स्पर्धेवर आपले नाव कोरले. याबद्दल पिंपरी-चिंचवड शहरातील जे.डी. ग्रुप तर्फे या अकॅडमीच्या खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जे.डी.ग्रुपचे प्रमुख जवाहर ढोरे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.