मराठी व उर्दु माध्यमातून नवीन वर्ष २०२२ चे कालनिर्णय नगरसेविका प्रियांका प्रविण बारसे यांच्याकडुन गवळीनगर प्रभागात वाटप व होम टु होम संवादयात्रेस सुरुवात.
गेली पाच वर्षापासून नगरसेविका प्रियांका बारसे गवळीनगर प्रभागामध्ये कार्याच्या माध्यमातून संपर्कात आहेत .
हे वर्ष सरता सरता त्यांनी गवळीनगर प्रभागातील नागरिकांसाठी कालनिर्णय- दिनदर्शिका २०२२ वाटपास प्रभागातील ग्रामदैवत तुकाई मातेचे आशीर्वाद घेऊन वाटप व संवादयात्रेस सुरुवात केलेली आहे.
गवळीनगर प्रभागातील मुस्लीम नागरिकांची संख्या विचारात घेऊन ऊर्दू मराठी व इंग्रजी अशा माध्यमातु न हे कालनिर्णय नागरिकांपर्यंत पोचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे .
हे काम प्रभागातील गरजू महिलांनाच करायला देऊन प्रभागातील महिलांच्या संसाराला हातभार लावण्याची दूरदृष्टी त्यांनी ठेवलेली आहे .
विशेष म्हणजे बारसे ताईंनी कॅलेंडरच्या महिन्याच्या प्रत्येक पानावर महिला सक्षमीकरणावर आधारित संदेश नागरिकांना दिले आहेत.
तर त्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा फोटोच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवला आहे.
प्रियांकाताईंची हीच कामाची पध्दत त्यांची प्रभागात वेगळी ओळख निर्माण करते जी प्रभागातील नागरिकांकडुन कौतुकास पात्र ठरते.