काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त प्रभाग क्रमांक 13,14,15 आणि 16 मधील काँग्रेस प्रेमी नागरिकांच्या वतीने सत्कार
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ डिसेंबर) :- काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त शहर काँग्रेसचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष दिलीप पांढरकर यांचा प्रभाग क्रमांक 13,14,15 आणि 16 मधील काँग्रेस प्रेमी नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित कार्याध्यक्ष दिलीप पांढरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे एक निष्ठ कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत.
दिवंगत प्रा रामकृष्ण मोरे मंत्री असल्याच्या काळापासून ते शहर काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत.
आकुर्डी येथे अनेक समाजपयोगी उपक्रम ते राबवत असतात पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये काँग्रेसचा एकही नगरसेवक नसतानाही शहरांमध्ये विविध विषयांवर काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलने करताना त्यांचा सक्रिय सहभाग असतो. या बाबीची दखल घेत पांढरकर यांना पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी दिली आहे.त्यांची नुकतीच पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती झाली आहे.
त्यानिमित्ताने पांढरकर यांचा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव सचिन साठे यांच्या हस्ते मंगळवारी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नव निर्वाचित कार्याध्यक्ष दिलीप पांढरकर त्यांनी सांगितले की शहरातील काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील निवडणूक 2022 मध्ये काँग्रेसचे जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि ह्या भ्रष्टाचारी सरकारला त्यांची जागा दाखवून देश वाचविण्याचा प्रयत्न करणार आहे.
येत्या निवडणुकीत शहरातील जनता हे आम्हाला सहकार्य करणार कारण शहरात विकासाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार होत आहे थोड्या दिवसापूर्वी स्थायी समितीचे अध्यक्ष यांना भ्रष्टाचार करताना रंगेहात पकडण्यात आले यावरून हे सरकार किती भ्रष्टाचारी आहे हे जनतेने ओळखून घेतले आहे असे संबोधित केले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे म्हणाले देशाच्या आतापर्यंत झालेल्या सर्वच पंतप्रधानांचे आम्ही आभार मानतो.कारण सत्तर वर्षात जे कमावले ते गेल्या सात ते आठ वर्षांत आपण गमावून बसलो आहोत. देशाचा विकास हाच मुळातच काँग्रेसच्या कष्टामुळे झाला आहे. आज पर्यंत देशवासीयांनी काँग्रेसला भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळेच जगाच्या व्यासपीठावर भारताचा सन्मान जगातील सर्व देशांनी केला आहे.
आकुर्डी येथील श्री दिलीपशेठ पांढरकर कार्यध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात सत्काराचा हा कार्यक्रम झाला. यावेळी अशोक काळभोर संदेश नवले किसनराव भालेकर , हरिदास नायर, धोंडीबा भालेकर गणपतराव भोभाळे, हसीना शेख, आयुब शेख, हनुमंतराव जाधव, ऍड राजेंद्र काळभोर,प्रतिभा कांबळे , सोयब नायाब पै निवृत्ती काळभोर ,मकरध्वज यादव उपस्थित होते यांनी केले.स्वागत हर्षवर्धन पांढरकर यांनी केलं. सूत्रसंचालन आणि आभार सुरेश लिंगायत यांनी केले.