शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२९ डिसेंबर) ;- महापालिका हद्दीत लोकसंख्येची वाढ झाली असून लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व देणे गरजेचे आहे. लोकसंख्येच्या आधारे नगरसेवकांची संख्या वाढविणारे विधेयक २८ डिसेंबर रोजी विधानसभेत मंजूर करण्यात आले. हे विधेयक बहुसंख्य लोकसंख्येला प्रतिनिधित्व देण्यासाठी नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे.
त्याच निकषानुसार आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार वाढत्या लोकसंख्येच्या एक टक्का कायम कामगारांचीही भरती व्हायला हवी.त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेतील रुग्णालयीन कामगार, सफाई कामगार, अग्नीशामक कामगार, शिक्षक इतर सर्व प्रकारच्या कायमस्वरूपी कामगारांची भरती व्हायला पाहिजे. लोकसंख्येला वाढीच्या तुलनेत नागरी सुविधा वाढायला हव्यात, अशी मांगणी हनुमंत लांडगे,प्रदेश सरचिटणीस भाजपा,महाराष्ट्र,कामगार आघाडी यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.