शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२९ डिसेंबर) :- प्रभाग क्र. १५ मधील नागरीकांच्या सूचनांची दखल घेत, महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने भक्ती शक्ति चौक ते रावेतकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोकळ्या भूखंडावर बेकायदेशीरपणे वसलेल्या टपऱ्या व झोपड्यांवर सोमवारी (दि. २७) निष्कासनाची मोठी कारवाई केली. या कारवाईत अंदाजे १५३०० चौ. फुटाचे २५ अनधिकृत पत्राशेड पाडण्यात आले. ज्यात टप-या, झोपड्या, हातगाड्यांचा समावेश आहे. या कारवाईचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका शैलजाताई मोरे आणि प्रभागातील नागरिकांनी स्वागत केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शैलजाताई मोरे यांनी म्हटले आहे की, ” अ ” क्षेत्रीय कार्यालयांतर्गत निगडीतील भक्ती शक्ति चौक ते रावेत नविन पुलाकडे जाणा-या बी. आर. टी. रस्त्यालगतच्या मोकळ्या भूखंडावर गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण वाढले होते. येथे पत्राशेड, टपऱ्या हातगाड्यांचा सुळसुळाट झाला होता. त्यामुळे परिसरात गुन्हेगारी वाढली होती. वर्दळीचा रस्ता असल्यामुळे नागरिकांना विशेषतः महिलांना येथून ये-जा करताना जीव मुठीत घेऊन जावे लागत असे. याबाबत प्रभागातील जेष्ठ नागरिक व महिलांच्या बऱ्याच तक्रारी आमच्या संपर्क कार्यालयाकडे आल्या होत्या. याची दखल घेऊन रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला, असेही म्हटले आहे.
आयुक्त राजेश पाटील यांना भेटून सविस्तरपणे हकीकत सांगितली. व त्यांना निवेदन दिले. पुण्यात निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे व हवेली तालुका तहसीलदार गीता गायकवाड यांची भेट घेऊन त्यांनाही मागणीचे निवेदन देत, कारवाईचे आदेश देण्याची विनंती केली. त्यांनीही सदर विषय नगरविकास प्राधिकरणच्या ताब्यात येत असल्याचे सांगितले. पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांकडे विनंती केली असता अखेरीस आयुक्तांनी कारवाईचे आदेश देऊन मोकळ्या भूखंडावरील बेकायदेशीर टपऱ्या व झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई केली. सदर जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये याकरिता तारेचे कुंपण करण्यात यावे यासाठी मा. आयुक्त यांना व सहशहर अभियंता BRTS पिंपरी चिंचवड मनपा यांना निवेदन देण्यात आले. त्यामुळे प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे, असे या पत्रकात नगरसेविका मोरे यांनी म्हटले आहे.