शबनम न्यूज : पुणे (दि.३० डिसेंबर) :- नववर्षाचे स्वागत करण्यासाठी भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमइडी) तर्फे ३१ डिसेंबर रोजी रस्ता सुरक्षा,कोविड सुरक्षा मोहीम आखण्यात आली आहे.वाहतूक सुरक्षा आणि कोविड साथीपासून बचावाविषयक संदेश असलेली शुभेच्छा पत्रे,५०० चॉकलेट,५०० मास्क संस्थेच्या पौड रस्ता कॅम्पसच्या परिसरात वाटली जाणार आहेत.सोशल मीडिया द्वारे १ लाख पुणेकरांपर्यंत रस्ता सुरक्षा ,कोविड सुरक्षेचे संदेश पोहोचविले जाणार आहेत.
आयएमइडी चे संचालक आणि भारती विद्यापीठाचे व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ सचिन वेर्णेकर,राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ विजय फाळके यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.या मोहिमेचा प्रारंभ ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता पौड रस्ता कॅम्पस मध्ये होणार आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी,प्राध्यापक,कर्मचारी सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून सहभागी होतील. दर वर्षी वाहतूक आणि रस्ते सुरक्षा विषयक जागृती महाविद्यालयातर्फे आयोजित केली जाते. या उपक्रमाचे हे नववे वर्ष आहे.