१०२ जणांचा उत्सफूर्त सहभाग
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.३० डिसेंबर) :- पिंपरी चिंचवड मधील यशवंतनगर मध्ये धम्मानंद बुद्ध विहाराच्या ९ व्या वर्धापण दिनानिम्मित व मा. महापौर डॅा. वैशाली घोडेकर (लोंढे) यांच्या वाढदिवसानिमित्त धम्मानंद प्रतिष्ठाण च्या वतीने अध्यक्ष अविनाश चौधरी यांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या भव्य रक्तदान शिबीरात सुमारे १०२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
मोरया रक्तपेढीच्या सहकार्यांने आयोजित रक्तदान या शिबिरांचे उद्घाटन शिबीरातील प्रथम रक्तदाते सचिन बोधणी यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी शिबिरात रक्तदान करणार्या रक्तपेढीचे प्रमाणपत्र, मास्क व सॅनिटायझर देण्यात आले .
याबाबत माहीती देताना शिबीराचे आयोजक अविनाश चौधरी म्हणाले,
“राहुलभाऊ भोसले व डॅा. वैशाली घोडेकर यांच्या मार्गदर्शनामुळे गेल्या अनेक वर्षापासुन आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. व नागरिकांच्या प्रतिसाद उत्स्फुर्त होत आहे. कोविड १९ च्या प्रसारामुळे राज्यांत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. व धम्मानंद प्रतिष्ठाण चे एक कर्तव्य म्हणून या रक्तदान शिबीरांचे आयोजन केले, प्रतिष्ठाण च्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणुन रक्तदान शिबीरांचे आयोजन केले आहे कारण आपल्या महाराष्ट्रांच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व जनतेला रक्तदानाचे आवाहन केले आहे व मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, धम्मानंद प्रतिष्ठाण ने शिबीर घेतले आहे रक्तदान करा आणि प्रेमाची नाती जोडा हा संकल्प करा” असे चौधरी यांनी सांगितले.
रक्तदान शिबीरांस मा.विरोधी पक्षनेते वि. नगरसेवक राहुलभाऊ भोसले, मा. महापौर वैशाली घोडेकर(लोंढे), सोयुज लोबो, परिक्षित वाघेरे,मंगेश कदम , रविनाना चौधरी, नितीन प्रधान, सचिन पालके, उमेश जावळे, अशोक वाघमारे, दिपक ढेरे, रेड्डी सर, दत्ता वाघमारे, निलेश महाजन ,शिवानंद घोलप व प्रतिष्ठाण चे राजेश कदम, स्वप्निल गायकवाड, प्रशांत चौधरी, निखिल धोत्रे, द्यानंद सुर्यवंशी, मनोज कदम, नितीन ठाणांबिर, मुकेश किरतकर्वे, राजरत्न चौधरी, वैभव वाघमारे, अशितोष वराडे, अभिषेक मानशेठ्ठी , विक्की धोत्रे, सिद्धार्थ किरतकर्वे, आकाश गायकवाड व पदाधिकारी यांनी शिबीरांस उपस्थिती दाखविली व इतर ही रक्तदात्यांनी पुढाकार घेवुन रक्तदान केले.