शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.३० डिसेंबर) :- पिंपरी चिंववड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कुलच्या पूर्व- प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी रायन इंटरनॅशनल अॅकॅडमी पुणे यांनी आयोजित केलल्या “तिरंगा 2021” या स्पर्धेत वार्षिक आंतरशालेय स्टोरी टेलिंग आणि व्हेजिटेबल आर्ट स्पर्धेत ज्युनियर केजीच्या विरीका वाघमारे हिने दुसरा क्रमांक पटकाविला. ‘Family -A Circle of Love & Strength’ या विषयावर विरीका वाघमारे हिने उत्कृष्ट सादरीकरण केले.
या स्पर्धेत एस. बी. पाटीलच्या नऊ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांना पूर्व प्रार्थमिक विभागाच्या समन्वयिका शुभांगी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. विरीकाच्या या यशाबदल पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे. उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि शाळेच्या मुख्याध्यपिका डॉ. बिंदू सैनी यांनी अभिनंदन केले.