शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
रमेश दादा बागवे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारे समाज भूषण पुरस्कार 2021 – 2022 जाहीर झाले आहे, यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील काँग्रेसचे युवा नेते संदेश प्रकाश बोर्डे यांना युवारत्न भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्कार सोहळा शनिवार दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत नटसम्राट निळू फुले रंगमंदिर पिंपळे गुरव पुणे येथे होणार आहे.
काँग्रेसचे युवा नेते संदेश बोर्डे यांना युवा रत्न भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे, संदेश बोर्डे यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत तसेच त्यांचे क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य या सर्व बाबींची दखल घेत त्यांना हा युवारत्न भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे, संदेश बोर्डे यांनी आतापर्यंत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले तळागाळातील नागरिकांना योग्य प्रकारे शासनाच्या योजना मिळाव्यात याकरिता प्रयत्न केले आहेत तसेच क्रीडा क्षेत्रात त्यांनी आपल्या संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशन च्या वतीने अनेक क्रीडा स्पर्धा आयोजित करून युवकांना तसेच लहान मुलांना क्रीडा क्षेत्रात आपले करियर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे तसेच सध्याचे विविध भागातील बालगुन्हेगार मुलांना क्रीडा शिक्षण देण्याचे काम करीत आहेत या सर्व कामांची दखल रमेश बागवे प्रतिष्ठान वतीने घेण्यात आली असून त्यांना हा युवारत्न भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे याबद्दल संदेश बोर्डे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
सालाबाद प्रमाणे रमेश दादा बागवे प्रतिष्ठान यांच्या वतीने सन 2021 – 2022 चे समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात येतात असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले पुरस्कार मूर्ती पुढील प्रमाणे
(1)मा.श्री सावळेराम किसनराव भोर
(साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार)
(2) मा. श्री प्रसाद सांगळे साहेब
( विधी सेवा भूषण पुरस्कार )
(3) मा.श्री आबासाहेब वाघमारे
( समाज भूषण पुरस्कार )
(4) मा.श्री विश्वनाथ दौलतराव शिंदे
( सांगवी समाज भूषण पुरस्कार )
(5) मा. सौ सुषमाताई राजेंद्र तनपुरे
( समाज भूषण पुरस्कार)
(6) ह भ प पंढरीनाथ लक्ष्मण ढोरे
( वारकरी भूषण पुरस्कार )
(7) ह भ प प्रभाकर महाराज कराळे
( वारकरी भूषण पुरस्कार )
(8)मा.श्री अरुण शेठ पवार
( वृक्षमित्र पुरस्कार )
(9)मा.श्री संदेश प्रकाश बोर्डे
( युवा रत्न भूषण पुरस्कार )
(10)मा श्री. राजू दत्तु सावळे
( समाज भूषण पुरस्कार )
(11) ह.भ.प नागेश महाराज बेंडे
( संत सेवा भूषण पुरस्कार)
सदर पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक 1/1/2022 रोजी सायंकाळी 4 ते 6 . वा नटसम्राट निळू फुले रंगमंदिर पिंपळे गुरव पुणे 61 येथे होणार आहे .
सदर कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे सचिव मा श्री रविंद्र दळवी साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेषराव बाजीराव कसबे यांनी दिली आहे.