शबनम न्युज : पिंपरी चिंचवड (दि.३१ डिसेंबर) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी शहरातील नागरिकांना २०२२ या नवीन वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
महापौर माई ढोरे म्हणाल्या, देशात सर्वत्र कोरोना ओमीक्रॉन या विषाणूंचे सावट पसरलेले आहे. तथापि शहरातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास उत्तम प्रतिसाद दिलेला असून मोठ्या प्रमाणावर लसीकरण करुन घेतलेले आहे. तरीसुध्दा कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरवासियांनी कोरोना नियमांचे पालन करावे, अनावश्यक गर्दी टाळावी, मास्क परिधान करावा, हात स्वच्छ धुवावेत आणि सॅनिटायझरचा वापर करावा असे त्यांनी आवाहन केले. तसेच त्यांनी शहरवासियांना येणारे नवीन वर्ष सर्वांना आरोग्यदायी, आनंदी आणि सुखासमाधानाचे जावो अशा शुभेच्छाही दिल्या.
Advertisement