शबनम न्यूज : पिंपरी-चिंचवड (दि.०३ जानेवारी) :- रमेश दादा बागवे प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना नुकतेच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पिंपळे गुरव येथील निळूभाऊ फुले नाट्य सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील काँग्रेसचे युवा नेते संदेश प्रकाश बोर्डे यांना युवारत्न भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले .
काँग्रेसचे युवा नेते संदेश बोर्डे यांना युवा रत्न भूषण पुरस्कार प्रदान झाला आहे, संदेश बोर्डे यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत तसेच त्यांचे क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य या सर्व बाबींची दखल घेत त्यांना हा युवारत्न भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे, संदेश बोर्डे यांनी आतापर्यंत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले तळागाळातील नागरिकांना योग्य प्रकारे शासनाच्या योजना मिळाव्यात याकरिता प्रयत्न केले आहेत तसेच क्रीडा क्षेत्रात त्यांनी आपल्या संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशन च्या वतीने अनेक क्रीडा स्पर्धा आयोजित करून युवकांना तसेच लहान मुलांना क्रीडा क्षेत्रात आपले करियर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे तसेच सध्याचे विविध भागातील बालगुन्हेगार मुलांना क्रीडा शिक्षण देण्याचे काम करीत आहेत या सर्व कामांची दखल रमेश बागवे प्रतिष्ठान वतीने घेण्यात आली. याबद्दल संदेश बोर्डे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
या सोहळ्याला पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर सौ माई ढोरे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे , अतुल शितोळे प्रा.मार्तेंड साठे , ह.भ.प धर्मचार्य शंकर महाराज शेवाळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सचिव सचिन भाऊ साठे , माजी नगरसेवक राजेंद्र जगताप , विजू आण्णा जगताप, शेषराव कसबे , कुमार ढोरे , बाळासाहेब शितोळे, आण्णासाहेब गोडसे , वाघ महाराज , बंडोपंत शेळके , महेश भागवत , सुदामा ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते
(1) मा.श्री सावळेराम किसनराव भोर
(साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार)
(2) मा. श्री प्रसाद सांगळे साहेब
( विधी सेवा भूषण पुरस्कार )
(3) मा.श्री आबासाहेब वाघमारे
( समाज भूषण पुरस्कार )
(4) मा.श्री विश्वनाथ दौलतराव शिंदे
( सांगवी समाज भूषण पुरस्कार )
(5) मा. सौ सुषमाताई राजेंद्र तनपुरे
( समाज भूषण पुरस्कार)
(6) ह भ प पंढरीनाथ लक्ष्मण ढोरे
( वारकरी भूषण पुरस्कार )
(7) ह भ प प्रभाकर महाराज कराळे
( वारकरी भूषण पुरस्कार )
(8) मा.श्री अरुण शेठ पवार
( वृक्षमित्र पुरस्कार )
(9) मा.श्री संदेश प्रकाश बोर्डे
( समाज भूषण पुरस्कार )
(10) मा श्री. राजू दत्तु सावळे
( समाज भूषण पुरस्कार )
(11) ह.भ.प नागेश महाराज बेंडे
( संत सेवा भूषण पुरस्कार)
(१२) श्री राजाराम अस्वरे
( शौर्य पुरस्कार)
यांना गौरविण्यात आले.