शबनम न्यूज : मावळ (दि.०३ जानेवारी) :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे व महिला शिक्षण दिनाचे औचित्य साधून स्व.सुदामभाऊ कदम प्रतिष्ठाणच्या वतीने शिंदेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.संगिता धन्वे यांचा आदर्श शिक्षिका म्हणून सन्मान करण्यात आला.यावेळी प्रतिष्ठाणचे संस्थापक श्री.नवनाथ पडवळ,वडेश्वरचे मा.सरपंच श्री.शांताराम लष्करी,युवा नेते श्री.समीर कदम,टाकवे-वडेश्वर गट राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष श्री.नवनाथ पडवळ,ग्रामपंचायत सदस्य श्री.रामनाथ बधाले,केंद्रप्रमूख श्री.रघूनाथ मोरमारे,श्री.गोकूळ लोंढे सर इ.मान्यवर उपस्थित होते.
श्रीम.संगिता धन्वे या उपक्रमशील शिक्षिका असून विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी विविध सहशालेय उपक्रम त्या सातत्याने राबवत असतात.मावळ तालुक्यातील महिला शिक्षिका या विद्यार्थी हीतासाठी सातत्याने धडपडत असतात.त्यांच्या कार्याचे कौतूक करुन त्यांना प्रोत्साहन देणे हा आमच्या प्रतिष्ठाणचा देण्यामागचा हेतू आहे असे मत प्रतिष्ठाणचे संस्थापक श्री.नवनाथ पडवळ यांनी व्यक्त केले.
श्रीम.संगिता धन्वे यांना यापूर्वी शिवसेना पक्ष आयोजित आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला असून त्यांच्या सन्मानाबद्दल वडेश्वर परिसरात कौतूक होत आहे.