भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
शबनम न्यूज :पुणे (दि.०४ जानेवारी) :- भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ तू छेड सखी सरगम ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
शनीवार, दि.८ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
या कार्यक्रमांत राग संगीत, रागांचा परिचय करून दिला जाणार आहे, रागांवर आधारित लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण केले जाणार आहे.कार्यक्रमाची संकल्पना , संहिता आणि निवेदन सुप्रिया चित्राव यांचे असून श्रृती देवस्थळी , अभिजीत पंचभाई सहभागी होणार आहेत. त्यांना विनीत तिकोनकर तबल्यावर ,तर हार्मोनिअमवर प्रसन्न बाम साथ देतील.
हा कार्यक्रम विनामूल्य आहे.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १०८ वा कार्यक्रम आहे.प्रवेश कोविड विषयक सर्व प्रोटोकॉल पाळून दिला जाईल .