पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आणि ग्रामीण भागात मास्क नसेल तर दंडात्मक कारवाई
शबनम न्यूज :पुणे (दि.०४ जानेवारी) :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कोरोनास्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी पुण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय आज घेतला आहे. या निर्णयानुसार पुणे शहर आणि जिल्ह्यातील 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा बंद राहणार आहेत. या वर्गांचे ऑनलाईन क्लास सुरु राहतील. तर 9वी आणि 10वीचे वर्ग हे ऑफलाईन पद्धतीनेच सुरु राहतील असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.
कोरोनाची स्थिती बिकट होत आहे. पुणे जिल्ह्यात 74 टक्के लोकाचं लसीकरण झालं आहे. राहिलेल्या नागरिकांनी लवकर लस घ्यावी. लोकांना विनंती आहे की कठोर निर्णय लागू करण्यास भाग पाडू नका, असं आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केलंय. तसंच पुणे शहरात पॉझिटिव्हिटी रेट 18 टक्के झाला आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. पुणे शहरात 3 हजार 950 सक्रीय रुग्ण आहेत. 15 ते 18 वयोगटातील मुलांचं 4 टक्के लसीकरण झालं आहे. पालक आणि विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.
विधान भवन येथे आयोजित पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते. बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
१ ली ते ८ वीपर्यंतच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद !
Advertisementआठवडाभरात वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रत्यक्ष सुरु असलेल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मा. पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत झाला आहे. सदरील वर्गांना ऑनलाईन परवानगी असेल.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 4, 2022
दोन लसमात्रा नाही तर प्रवेश नाही
तसंच वेगवेगळ्या डिझाईनचे कापडी किंवा 2 प्लायचे सर्जिकल मास्क वापरू नका. N95 किंवा 3 प्लाय असलेल्या मास्कचाच वापर करा. पुण्यात उद्यापासून मास्क नसेल तर 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. तर मास्क नसताना थुंकल्यावर 1 हजार रुपये दंड आकारला जाईल. त्याचबरोबर उद्यापासून पुणे जिल्ह्यात सर्वत्र मॉल, खासगी तसंच सरकारी कार्यालयात कोरोना लसीचे दोन्ही डोस झाले नसतील तर प्रवेश मिळणार नाही.पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आणि ग्रामीण भागात मास्क नसेल तर दंडात्मक कारवाई केली जाणार. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस खात्याला सक्त सूचना दिल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
मास्क नसल्यास ५०० तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रुपये दंड !
Advertisementमास्क न घातल्यास ५०० रुपये दंड आणि मास्क नसताना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड आकारण्याचा निर्णय आज पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत घेण्यात आला असून ५ जानेवारी २०२२ पासून याची अंमलबजावणी होत आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 4, 2022
ओमायक्रोन विषाणूच्याच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासन वारंवार निर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. यातच आता मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड आणि मास्क नसताना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
याबाबत मंगळवार (दि.4) रोजी पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारी २०२२ पासून याची अंमलबजावणी होत आहे. असे ही यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.