शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०५ जानेवारी) :- आज दि. ०५ जानेवारी २०२२ रोजी प्रभाग 28 रहाटणी – पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी, साई चौक येथील वाकड वरून पिंपळे सौदागरला येणाऱ्या ग्रेड सेपरेटरचे आज पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री संजोग वाघेरे पाटील मा. विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक श्री विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते फीत कापून नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आला .
यावेळी नगरसेवक श्री. मयुर कलाटे नगरसेविका सौ. शितलताई नाना काटे,श्री सागर कोकणे,उद्योजक श्री शिरीष साठे, सुमित डोळस, श्री गौरव शितोळे, श्री उत्तम धनवटे आदी उपस्थित होते.गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक श्री विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका सौ .शितलताई नाना काटे यांच्या पाठपुराव्याने या ग्रेड सेपरेटर चे काम पूर्ण करण्यात आले.या ग्रेड सेपरेटरमुळे आता या ठिकाणी होणारी वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न पूर्णपणे सुटणार आहे.विशेषतः पिंपळे सौदागरहून आयटी पार्क हिंजवडीला जाणाऱ्या नागरिकांना पूर्वी सारखी वाहतूक कोंडीची समस्या भासणार नाही, त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.