शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०५ जानेवारी)
अनाथांना पदरात घेवुन त्यांना आईचं प्रेम दिलं. त्यांच्या उद्धारासाठी आपलं सार आयुष्य खर्ची घातलं.
स्मशानाच्या काळोख्यात तुकडे मोडुन अनाथांच्या आयुष्यात प्रकाश पसरवला आणि आज या लाखो लेकरांना पोरकं करुन माई आपल्याला सोडुन गेली..!
आज सरस्वती अनाथ आश्रम येथे पार्थ पवार फाऊंडेशन व अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट दापोडी यांच्या वतीने पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याप्रसंगी नगरसेवक राजाभाऊ बनसोडे,स्वीकृत नगरसेवक संजय कणसे व सरस्वती अनाथ आश्रमातील मुले उपस्थित होते.
Advertisement