शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०५ जानेवारी) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात चिंचवड मोहननगर व पिंपरी उद्यमनगर परिसरामध्ये HDH बेघरांसाठी घरे या योजनेतून घरांचे प्रकल्प पुर्णत्वाकडे असून याठिकाणी जेवढे लाभधारक आहेत त्यापेक्षा जास्त घरे निर्माण होत आहेत. त्याच बरोबर P.M.A.Y. योजनेतून शहरात असंख्य लाभधारकांनी घरासाठी अर्ज केलेले असून अनेक लाभधारक प्रतिक्षेत आहेत. तरी जर HDH योजनेतील उर्वरित घरे P.M.A.Y. योजनेमधील प्रतिक्षेत असलेल्या लाभधारकांना दिली तर याचा फायदा या गरीब व गरजु कुटुंबीयांना मिळेल. अशी याबाबत मागणी शहर सुधारणा समितीचे सभापती श्रीमती अनुराधा गणपत गोरखे यांनी मा.आयुक्त यांच्याकडे मागणी केली आहे.