शबनम न्यूज : पुणे (दि.०६ जानेवारी) :- पीएमपीएमएल कडून दिनांक ४/१/२०२२ पासून अटल बस सेवेअंतर्गत मार्ग क्रमांक के १८ कात्रज ते वाघजाईनगर हा नवीन बस मार्ग सुरू करण्यात आला. कात्रज ते वाघजाईनगर फक्त ५ रुपये तिकिटदर असल्याने सर्वसामान्य नागरिकांना या बससेवेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक मा. श्री. युवराज बेलदरे, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मा. श्री. अभिजीत सोनवणे यांच्या हस्ते या बससेवेचे उदघाटन करण्यात आले. मा. श्री. युवराज बेलदरे व मा. श्री. अभिजीत सोनवणे यांनी या बसेवेसाठी पाठपुरावा केला.
याप्रसंगी पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक श्री. दत्तात्रय झेंडे, कात्रज डेपो मॅनेजर श्री. विजय रांजणे,
असि. डेपो मॅनेजर श्री. शैलेंद्र जगताप, कार्यालय अधिक्षक श्री. शिवाजी जाधव, असि. टाइम किपर श्री. धनंजय कदम यांची
प्रमुख उपस्थिती होती.
मार्ग क्रमांक के १८ कात्रज ते वाघजाईनगर या बससेवेचा मार्ग कात्रज, संतोषनगर, मारुती मंदिर, आगम मंदिर, दुगड
फार्म, साध्वी केंद्र, सच्चाईमाता मंदिर, अचल फार्म सोसायटी, रंगा शेठ चौक, हरिओम कॉलनी, सारथी मंगल कार्यालय,
वाघजाईनगर असा आहे. सध्या या बसमार्गावर एका बसद्वारे दर २५ मिनिटांनी बससेवा उपलब्ध असेल. प्रवाशी प्रतिसाद व उत्पन्न वाढल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढविण्यात येतील.
याप्रसंगी बोलताना नगरसेवक मा. श्री. युवराज बेलदरे म्हणाले,आम्ही या बससेवेसाठी पाठपुरावा केला व पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी या भागातील सर्वसामान्य नागरिकांची अडचण लक्षात घेऊन तत्परतेने ही बससेवा सुरू
केली. ही बससेवा या भागातील लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
पीएमपीएमएल चे मुख्य वाहतूक व्यवस्थापक श्री. दत्तात्रय झेंडे म्हणाले,या बससेवेमुळे या परिसरातील लोकांना
फक्त ५ रुपयांत कात्रज ते वाघजाईनगर असा प्रवास करता येणार आहे. तसेच कात्रज मुख्य स्थानकावरून शहराच्या विविध भागात जाण्यासाठी पीएमपीएमएलची पूरक बससेवा उपलब्ध आहे.
मा. श्री. अभिजीत सोनवणे म्हणाले, ही बससेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत किफायतशीर आहे. खाजगी
वाहनांचे भाडे लोकांना परवडणारे नाही. वाघजाईनगर व सच्चाईमाता मंदिर परिसरातील लोकांना या बससेवेमुळे मोठा
दिलासा मिळणार आहे.
कार्यक्रमास श्री. विठ्ठल चोरघे, श्री. प्रकाश पवार, श्री. अशोक साळुंखे, श्री. दयानंद पाटील, श्री. विजय जाधव,
श्री. सतिश उळागड्डे, श्री. नानासो पिंगळे, कात्रज आगारातील कर्मचारी श्री. संतोष सुतार, श्री. संतोष चव्हाण, श्री. चंद्रकांत
पिंगळे, श्री. तेजस गायकवाड उपस्थित होते.