शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०७ जानेवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील साईनगर या भागातील लाईटचे खांब तातडीने बदलण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उपाध्यक्ष चिंचवड विधानसभा बापू दिनकर कातळे यांनी अति कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.क.म. उपविभाग प्राधिकरण यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १६ मधील साईनगर या भागातील त्रिमूर्ती सोसायटी मधील लाईटचे खांब रस्त्याच्या मध्यभागी असल्यामुळे अपघाताची भीती आहे व भविष्यात अपघात होऊ शकतो. या कारणामुळे भविष्यात कसल्याही प्रकारचे या भागातील लोकांचे नुकसान होऊ नये म्हणून लाईटचा खांब तातडीने शिफ्ट करून देण्यात यावा, असेही सदर निवेदनात बापू कातळे यांनी नमूद केले आहे.
Advertisement
Advertisement