शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०७ जानेवारी) :- रावेत किवळे येथील दिपक मधुकर भोंडवे मित्र परिवाराच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भावी नगरसेवक दीपकभाऊ मधुकर भोंडवे यांच्या हस्ते पत्रकारांना गौरविण्यात आले. या वेळी अक्षय वाघमारे, गोपी बावरा, संतोष भोंडवे, धनंजय सोळुंके, संतोष सक्सेना, सुनील भोंडवे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
दीपक भोंडवे यांनी सांगितले की, पत्रकार हा समाजाभिमुख व सामाजिक शिल्लक असतो. समाजातील तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम पत्रकार तळमळीने करीत असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा पत्रकार दिनाच्या निमित्ताने उचित सन्मान होणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिकांपर्यंत विविध बाबींचा व शासनाने वेळोवेळी घालून दिलेले नियम पोहोचविण्याचे काम पत्रकार उत्तम रित्या करीत आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. भविष्यात पत्रकारांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यात आपण कटिबद्ध आहोत. पत्रकार हा आपल्याला चालू घडामोडी पर्यंत पोहोचवतात. त्यामुळे त्यांना सन्मानित करणे हे गरजेचे आहे.