शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१२ जानेवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १६ , किवळे मधील युवक-युवतींना संगणक क्षेत्रात करिअर करण्याची महत्त्वाची संधी या प्रभागातील युवा नेते बापु कातळे यांनी अगदी कमी दरात उपलब्ध करून दिली आहे. बापु दिनकर कातळे व दिशा कंप्यूटर इंस्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने सवलतीच्या दरात संगणक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे.
9 ते 15 जानेवारी या कालावधीत बिग डिस्काउंट डेअ्झ ठेवण्यात आले आहे. यामध्ये एम एस ऑफिस, ऍडव्हान्स एक्सेल, टॅली, जीएसटी, 2D कॅड, 3D कॅड, कोरल ड्रॉ, फोटोशोप, इल्यूसट्रेटर, इनडिझाईन, सी प्रोग्रामिंग, सी ++, डीएस, बँकिंग, टॅक्सॲक्शन, ऑडिटिंग इत्यादी कोर्स फक्त 1450 रुपयांमध्ये ठेवण्यात आले आहे.
सवलतीच्या दरात संगणक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आल्याने अनेक युवक-युवतींना याचा फायदा होईल. तसेच सध्या संगणक युग असल्याने युवक युवतींना आपले करिअर घडविण्यास या संगणक अभ्यासक्रमाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, याच दृष्टिकोनातून युवानेते बापू कातळे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तरी प्रभागातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या उपक्रमात सहभाग घेऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन युवानेते कातळे यांनी केले आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी युवक-युवतींनी 9021479860 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.