शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१२ जानेवारी) :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून रावेत येथील समीर लॉन्स मध्ये माजी सैनिक सन्मान सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्यात सैन्यदलात विविध पदे भूषवलेल्या तसेच निवृत्तीनंतर विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी सैनिकांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला अशी माहिती निमंत्रक दीपक भोंडवे यांनी दिली यावेळी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम तसेच नृत्य आविष्कार आयोजित करण्यात आला होता त्याच मोठ्या संख्येने उपस्थित श्रोत्यांनी दाद दिली.
आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली यानिमित्ताने रावेत, किवळे, मामुर्डी विकास नगर परिसरातील माजी सैनिकांचा सन्मान या भागातील नेते दीपक भोंडवे यांच्या वतीने करण्यात आला. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात या माजी सैनिकांनी अथक प्रयत्न केले त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आपण त्यांचा हा सन्मान केला असल्याची भावना कार्यक्रमाच्या वेळी दीपक भोंडवे यांनी व्यक्त केली.