शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
उद्योजक व शिक्षणसंस्था चालक श्याम काळोखे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नुकतेच सहारा वृध्दाश्रमास एक महिन्याचा किराणा व धान्य वाटप केले.आंदर मावळमधील कुसवली या गावात अनाथ-निराधारांसाठी सहारा वृध्दाश्रम उभारण्यात आलेला आहे. श्याम काळोखे हे पिंपरी चिंचवडमधील प्रतिथयश व्यक्ती असून ते व त्यांचे वडील पांडुरंग काळोखे हे सामाजिक व धार्मिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असतात.
संत तुकाराम नगर परिसरात स्वामी एंटरप्राईझेस या नावाने एचपी गॅसचे वितरक म्हणून जबाबदारी सांभाळण्याबरोबरच डायमंड किडस या प्री प्रायमरी स्कुलचे व्यवस्थापन पाहतात.
नुकतेच त्यांनी आपली पत्नी मनिषा काळोखे व आपल्या दोन मुलींसह सहारा वृध्दाश्रमास भेट देऊन निराधार आजी आजोबांसमवेत दिवस घालविला. सोबत आणलेला किराणा सामान व धान्य त्यांनी वृध्दाश्रमाचे संचालक विजय जगताप यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष ॲड लक्ष्मण रानवडे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड सुनिता रानवडे हे देखील उपस्थित होते. अनाथ-निराधारांचं जगणं पाहून हेलावून गेलेल्या श्याम काळोखे यांनी वर्षातील सहा महिने आश्रमास किराणा सामान देण्याचे आश्वासन यावेळी दिले.