शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१७ जानेवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष प्रशांत सपकाळ यांच्यावतीने प्रभाग क्रमांक २३ मधील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले.
आयुष्यमान भारत कार्ड ही केंद्रीय योजना असून या योजनेअंतर्गत नागरिकांना आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात सुविधा मिळतात. या योजनेअंतर्गत नागरिकांना पाच लाखापर्यंत विमा दिला जातो. तसेच अनेक लाभ या योजनेअंतर्गत नागरिकांना मिळतात या योजनेचा आपल्या प्रभागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा व्हावा, या दृष्टिकोनातून प्रशांत सपकाळ यांनी प्रभाग क्र. २३ मधील ३५० नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड चे वाटप केले.
तसेच हे कार्ड वाटप करताना त्यांनी आवाहन केले आहे की, नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, आपण सदैव प्रभागाच्या विकासासाठी तसेच प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी कायम तत्पर राहणार असून ‘माझा प्रभाग निरोगी प्रभाग’ या उद्देशाने आपण हे कार्य केल्याचे प्रशांत सपकाळ यांनी या वेळी सांगितले.