शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१७ जानेवारी) :- साठ वर्षा वरील नागरीकांनी बुस्टर डोस घेण्यासाठी स्वत:हुन पुढाकर घ्यावा. जेष्ठ नागरीकांचे लसीकरण वेगाने करण्यात यावे असे मत महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले. कोरोना १९ च्या अनुषंगाने करणेत येत असलेल्य विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आढावा बैठक शनिवार दि.१५ जानेवारी २०२२ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय विधानभवन पुणे येथे पार पडली यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषद अध्यक्षा निलम गो-हे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरिष बापट, पुणे महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिं.चिं मनपा आयुक्त राजेश पाटील, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार तसेच जिल्हयातील महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
वाढता ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेवुन जेष्ठ नागरीकांचा बुस्टर लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. १८ ते ४५ वयो गटातील ९०% नागरिकांचे पहिला डोस झाले असून ८०% पेक्षा जास्त नागरीकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. तसेच १५ ते १८ किशोर वयीन वयोगटातील मुलांचे लसीकरण अत्यंत वेगाने सुरु असून त्यास किशोरवयीन मुलांचा उत्साह मोठया प्रमाणात दिसुन येत आहे. मुले स्वत:हुन पुढाकार घेवुन लसीकरणासाठी प्रतिसाद देत आहेत. अवघ्या ८ दिवसात २८% पेक्षा जास्त मुलांचे लसीकरण झाले आहेत असेही त्या म्हणाल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना युध्द पातळीवर सुरु आहेत असेही त्या म्हणाल्या.