शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२० जानेवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील नूतन शाळा, त्रिवेणीनगर, ताम्हणे वस्ती येथे १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका संगीता ताम्हाणे यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शासनाच्या आदेशाचे राज्यभर १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड मनपा ने ही मोहीम सुरू केलेली आहे. प्रभाग क्रमांक १२ मधील त्रिवेणीनगर ताम्हाणे वस्ती येथील कै.नूतन शाळा येथे लसीकरण सुरू करावे, जेणे करुन आमच्या दाट लोकवस्ती तेथील मुलांना लस जवळच्या केंद्रावर घेणे शक्य होईल. नागरिकांच्या घराजवळ केंद्र असल्याने १५ ते १८ वयोगटातील लसीकरण मोहीम यशस्वी होईल.
तरी नूतन शाळा त्रिवेणी नगर ताम्हणे वस्ती येथे १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, असेही सदर निवेदनात संगीता ताम्हाणे यांनी नमूद केले आहे.