शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२० जानेवारी) :- मुख्य रस्ते,महामार्ग,बीआरटी रोड आणि 18 किलोमीटर पेक्षा मोठ्या रस्त्यांचे यांत्रिकि पध्दतीने सफसफाईच्या कामासाठी दोन महिन्याकरिता घाईघाईने 24 लाख 96 हजार रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.हे अत्यंत चुकीचे आहे.निकोप पध्दतीने स्पर्धा होऊन निविदा प्रकिया राबवावी,अशी मागणी भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापौर यांना केली.
या विषयी अधिक माहिती देनाना वाघेरे म्हणारे की,महापालिका सभा दिनांक 20 जानेवारी 2022 च्या विषयपत्रिकेवर विषय क्रमांक 10 मध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांचे यांत्रिकीकरणद्वारे साफसफाईचा विषय प्रशासकीय मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. शहराचे दोन भाग करून अनुक्रमे 331 किलोमीटर व 339 किलोमीटर असे एकूण 670 किलोमीटर रस्त्यांची साफसफाई यांत्रिकीकरणद्वारे करण्यात येणार आहे. एकीकडे हा विषय सभेपुढे सुमारे 6 ते 8 महिने वारंवार तहकूब असताना महापालिकेने दिनांक 13 जानेवारी 2022 रोजी शहरातील मुख्य रस्ते, महामार्ग, बी आर टी रोड व 18 किलोमीटर पेक्षा मोठे रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई दोन महिन्याकरिता घाईघाईने 24 लाख 96 हजार रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.
यामध्ये अ) केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियामक मार्गदर्शक तत्त्वानुसार कोणतीही निविदा सूचना जारी केल्यानंतर निविदेचा अंतिम दिनांकाची किमान 21 दिवस मुदत असावी. संदर्भीय निविदा केवळ सात दिवसाच्या मुदतीने काढली आहे. ते सदर नियमाचे उल्लंघन आहे.
ब) कोणतीही निविदा सूचना जारी केल्या पासून त्याचे अंतिम दिनांकाच्या आधी सर्व निवेदनधारकांची निविदपूर्व बैठक बोलणे आणि त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे ही कायदेशीर आवश्यक बाब आहे.
केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियामक मार्गदर्शक तत्त्वानुसार कोणतेही निविदा सूचना जारी केल्यानंतर निविदेचा अंतिम दिनांका चे किमान सात दिवस आधी सदर निविदा पूर्व बैठकीचे शुद्धिपत्रक प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे.
परंतु सदर निविदा संशयास्पद रीतीने घाईघाईने फक्त सात दिवसात काढले असून ती निविदा पूर्ण बैठक वगळण्यात आली आहे. ही एक अतिशय गंभीर अनियमितता असून असे करण्यात विशिष्ट निवेदा धारकाला झुकते माप देण्याचा अधिकाऱ्यांचा संशयास्पद प्रयत्न दिसून येत आहे.
क) कोणतेही यंत्रसामुग्री करीत काढलेल्या निविदेत सदर यंत्रांची टेक्निकल स्पेसिफिकेशन असणे ही कायदेशीर बंधनकारक बाब आहे. अन्यथा विविध निवेदन धारकांची देयक बोली त्यांच्या मतानुसार वेगवेगळ्या यंत्रणानुसार वेगवेगळे येऊन दरपत्रक चुकते.
सदर निविदेमध्ये रस्ते स्वच्छता यंत्रांची कुठलीही टेक्निकल स्पेसिफिकेशन नाहीत. ही सदर निविदेत तांत्रिक अनियमितता असून गंभीर बाब आहे.
ड) स्वच्छ सर्वेक्षण हे कारण पुढे करून रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी दोन महिन्याची निविदा काढून विशिष्ट ठेकेदारांची रस्ते जाणारी यंत्रे महापालिकेला लावण्याचा अधिकाऱ्यांचा डाव व्यर्थ आहे कारण सदर रस्त्यांची यांत्रिकी साफसफाई गेले कित्येक वर्ष नियमित सुरूच आहे.
सदर दोन महिन्याच्या घाईघाईने काढलेल्या निविदा प्रक्रियेत झालेला गोंधळ लक्षात घेता आणि परिणामी नागरिकांच्या कर रूपाने पैशाचा होणारा अपव्यय आता सदर निविदा रद्द करून कॅक सारख्या नामवंत संस्था अंगिकारित असलेल्या क्यू.सी. बी.एस पद्धतीने 20 जानेवारी 2022 च्या सभेपुढील असलेल्या विषयाची निविदा काढून ती तातडीने अंमलबजावणी करून राबवावी. एखादी कंपनी, ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून दोन महिन्याची निविदा काढून महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी, अपव्यय करू नये अन्यथा जनहितासाठी आम्हाला न्यायालयात जावे लागेल असा इशारा ही वाघेरे यांनी दिला आहे.