शबनम न्यूज ; दि.२१ जानेवारी
ICC ने 2022 च्या T20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेशसह सुपर 12 मध्ये आहे. तर श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंडचे चार संघ 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या लेगसाठी पात्र ठरण्यासाठी आमनेसामने असतील. यामधून निवडलेल्या दोन संघांना सुपर 12 मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याचवेळी, भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्रांऊंड वर (MCG)येथे पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.
पाकिस्तानने टीम इंडियाचा 2021 मध्ये झालेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत पराभव केला होता. विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाला वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव स्विकारावा लागला होता.
आता रोहित शर्माला आपल्या कॅप्टन्सीत या पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे. त्यामुळे टीम इंडियाने रोहितच्या कॅप्टन्सीत पाकिस्तानला पराभूत करुन मागील स्पर्धेतील पराभवाचा बदला घ्यावा, अशीच भारतीयांची इच्छा आहे.
या संपूर्ण स्पर्धेत भारत एकूण पाच सामने खेळणार आहे. पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध, 27 ऑक्टोबर रोजी अ गटातील उपविजेत्यासह दुसरा, 30 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा, त्यानंतर चौथा सामना 2 नोव्हेंबर रोजी बांगलादेश विरुद्ध आणि पाचवा सामना 6 नोव्हेंबर रोजी गट ब विजेत्यासह होईल.
T20 विश्वचषकाचे सामने 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान खेळवले जाणार आहेत.
या स्पर्धेचं एकूण 2 टप्प्यात आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामने हे 16 ते 21 ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार आहेत. या दरम्यान वेस्टइंडिज आणि श्रीलंका टीम क्वालिफायर टीमसोबत दोन हात करतील. यानंतर 22 ऑक्टोबरपासून साखळी फेरीतील म्हणजेच दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना (Super 12) सुरुवात होणार.
कोणती टीम कोणत्या ग्रृपमध्ये?
एकूण 12 संघांना 2 ग्रृपमध्ये विभागण्यात आलं आहे. यातील ग्रृप 1 मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे. तर ग्रृप 2मध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशचा समावेश आहे.
उपांत्य फेरीचे सामने ९ आणि १० नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान होणार
विश्वचषकाचे सामने अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात ठिकाणी होणार आहेत. T20 विश्वचषकाचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने ९ आणि १० नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड ओव्हल येथे होणार आहेत.
टी-20 विश्वचषक स्पर्धेची हे आठवे वर्ष
टी-20 विश्वचषक स्पर्धेची हे आठवे वर्ष असेलत्याचबरोबर विश्वचषक सामन्यांच्या तिकिटांची विक्री ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मात्र, या काळात कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन करावे लागणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेची हे आठवे वर्ष असेल. ICC T20 विश्वचषक 2007 मध्ये सुरु झाला होता. महेंद्रसिंग धोनीच्या मार्गदर्शनाखाली भारताने ही ट्रॉफी जिंकली होती. यावेळी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे.
Fixtures of T20 World Cup 2022 have been announced. India placed alongside Pakistan, South Africa, Bangladesh & two qualifiers in Group 2 of Super 12 stage. India will square off against Pakistan in their first match of the tournament on October 23 at the MCG pic.twitter.com/M4QMuMaDOq
— ANI (@ANI) January 20, 2022
Advertisement
🗓️ Mark The Dates
Here's #TeamIndia's schedule for the #T20WorldCup ⬇️ pic.twitter.com/dlKLiM4tG7
Advertisement— BCCI (@BCCI) January 21, 2022