शबनम न्यूज ; पिंपरी चिंचवड (दि.२१ जानेवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी येथे विद्यार्थ्यांना स्पर्धापरिक्षाचा सराव करण्यासाठी अत्याधुनिक सोयी सुविधा असलेले डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानमंदिर बांधण्यात यावे, याबाबतचे निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना पिंपरी चिंचवड मनपा नगरसेवक राजू बनसोडे यांच्या वतीने देण्यात आले. त्याप्रसंगी अॅलेक्स दास,शंकर गायकवाड उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दापोडी येथे अनेक वर्षापासून विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी महाविहारात येतात परंतु MPSC व UPSC यांसारख्या स्पर्धापरिक्षाचा सराव करण्यासाठी विद्यार्थ्यांना घरात पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे दापोडीतील सर्वे क्रमांक ८१ ही १५ गुंठे जागा आरक्षित आहे. त्याठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने सुसज्य असे, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले मार्गदर्शन हॉल (100विद्यार्थ्यांसाठी), अभ्यासिका, ग्रंथालय, सेमिनार हॉल, स्पिकर रूम, वेटिंग रूम,महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, वाहनतळ, ऑफिस,उपहारगृह असलेले डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानमंदिर बांधण्यात यावे, असे सदर निवेदनात नगरसेवक राजू बनसोडे यांनी नमूद केले आहे.