शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२२ जानेवारी) :- सांगवी पोलीस चौकी ते सांगवी फाटा या रस्त्याचे अद्यावत पद्धतीने विकसित करण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार लक्ष्मण जगताप व कार्यक्रमाचे अध्यक्ष महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, ड प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, नगरसदस्य शशिकांत कदम, संतोष कांबळे, नगरसेविका सिमा चौगुले, शारदा सोनवणे माजी नगरसदस्य राजेंद्र राजापुरे आदि उपस्थित होते.
Advertisement