शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२४ जानेवारी) :- सपुंर्ण देशाबरोबरच पिंपरी चिंचवड शहरातही कोविड-१९ महामारीच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव जाणवत आहे. कोविड-१९ च्या तिसऱ्या लाट सुरु झाल्यापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दि. १५ डिसेंबर २०२१ ते २४ जानेवारी २०२२ या काळात शहरातील एकुण ३,३९,४७७ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या असुन या तपासणीमध्ये ५२,४१४ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. या रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे असलेले फक्त ३३ रुग्ण हे डेडीकेडेड कोव्हीड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरीत मध्यम लक्षणे असलेले ४०५ रुग्ण महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये तर सौम्य लक्षणे असलेले केवळ ८५९ रुग्ण महापालिकेच्या कोव्ड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यातआलेले आहेत. उर्वरित सर्व कोविड रुग्णांमध्ये कसल्याही प्रकारची लक्षणे नसल्यामुळे महापालिकेच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांचे घरीच राहून उपचार घेत आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या महत्वकांशी कोविड लसीकरण मोहीमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास प्राध्यान्य दिले. केंद्रसरकारने ठरवुन दिलेल्या नियोजनानुसार पिंपरी चिंचवड शहरात आज अखेर १७५९९१९ नागरिकांनी डोसची पहिली मात्रा घेतली असुन १४५७९३३ इतक्या नागरिकांनी डोसची दुसरी मात्रा घेतली आहे. याशिवाय १७३१४ नागरिकांनी बुस्टर डोसची मात्रा घेतलेली आहे. तसेच १५ ते १८ वयोगटातील ४८४४० मुलामुलींनी डोसची मात्रा घेतलेली आहे. या महत्वाकांशी लसीकरण मोहीमेचा प्रभावी अंमल केल्यामुळे तसेच कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुयोग्य नियोजन करुन जनजागृती केल्यामुळे आज शहरामध्ये कोविड-१९ चा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होवुन सुध्दा रुग्णांलयांमध्ये दाखल होणाऱ्या कोविड रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे कोविड-१९ चा प्रादुर्भाव होवुनही रुग्णांना रुग्णालयीन उपचार घेण्याची सुध्दा गरज पडत नाही यावरुन लसीकरण हाच यावर रामबाण उपाय असुन लसीकरण हेच कोविड-१९ चा प्रादुर्भाव न होण्यासाठी कवच असल्याचे वर नमुद केलेल्या आकडेवारी वरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे शहरातील ज्या नागरिकांनी अद्याप कोविड लसीकरण करुन घेतलेले नाही अशा नागरिकांना स्वयंस्फृर्तीने आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रात जावून लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.