शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२५ जानेवारी) :- हज हाऊसच्या लढ्यात पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग तर्फे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी व हज हाऊस चे सीईओं यांना पिंपरी चिंचवडचे तहसीलदार सौ. गीता गायकवाड व नायब तहसीलदार मा. प्रविण ढमाले यांच्या मार्फत पत्र पाठविण्यात आले.
हज हाऊस मुंबई येथील निवासी प्रशिक्षण संस्थेत झालेल्या अनावश्यक बदलामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही गंभीर बाब असल्याने याची दखल घेऊन मुंबई येथील UPSC निवासी प्रशिक्षण संस्था वाचविण्याच्या पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, उपाध्यक्ष हर्षद ओव्हाळ, चिंचवड विधान सभा अध्यक्ष फय्याज शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष मुख्तार शेख यांनी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना पत्र लिहून मागणी केली आहे.