शिवसेना विभाग प्रमुख किरण दळवी व सौ मीनल दळवी यांच्या वतीने उपक्रम
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.24 जानेवारी) :- शिवसेना हिंदुहृदयसम्राट , स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील युवानेते किरण दळवी यांच्या वतीने दहा महिला बचत गटांचे उद्घाटन करण्यात आले.
महिलांचे सक्षमीकरण व्हावे, महिला व्यवसायिक व्हाव्यात व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी साह्य मिळावे. या हेतूने महिला बचत गट स्थापन करणे आवश्यक आहे. या महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वतःची ओळख निर्माण करता येईल तसेच महिला सक्षमीकरणाचा उद्देश पूर्ण होण्यास सहकार्य मिळेल. या हेतूने आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सदर दहा महिला बचत गटांचे उद्घाटन केले असल्याचे यावेळी किरण दळवी यांनी सांगितले. महिला बचत गटाचे स्थापन करण्यात सौ मीनल किरण दळवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचेही यावेळी किरण दळवी यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार असून या महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आपली स्वतःची ओळख निर्माण करता येईल, असाही विश्वास यावेळी सौ. मीनल दळवी व युवा नेते किरण दळवी यांनी सांगितले.
तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त तहसीलदार गीता गायकवाड ,पिंपरी एम.एस.इ.बी. ऑफिस, चिंचवड ब प्रभाग कार्यालय यांना बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा देताना पुणे जिल्हा विद्यूत सनियंत्रण समितीचे सदस्य संतोष भाऊ सौंदणकर ,माजी नगरसेवक अनंत भाऊ कोऱ्हाळे, विभागप्रमुख नितीन भोंडे ,सुनिल पवार ,दिलीप भोंडवे , संदीप भालके ,किरण दळवी, महेश कलाल,युवासेना अजिंक्य उभाळे, माऊली जगताप आदी उपस्थित होते.