शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ जानेवारी) :- नुकतेच राज्यशासनाच्या मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला होता की शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण त्यांच्या शाळेतच होईल. त्या अनुषंगाने नगरसेविका प्रियांका प्रविण बारसे यांनी पाठपुराव्याने सु.ना. बारसे माध्यमिक विद्यालय,दिघी रोड येथे १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मोफत covid-19 लसीकरण मोहीम पार पडली.
डॉ.पवन कुमार साळवे डॉ. वर्षा डांगे डॉ.लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी भोसरी झोन डॉ.ऋतुजा लोखंडे यांच्या मार्फत व नगरसेविका प्रियांका प्रविण बारसे यांच्या संयोजनातून येथे लसीकरण मोहीम पार पडली.
लसीकरण मोहिमेत १४५ विद्यार्थी सहभागी झाले. सु.ना. बारसे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना लढे व शिक्षक कर्मचाऱ्यांनी ही मोहीम पार पाडण्यासाठी चांगले सहकार्य केले. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच शाळांना वैद्यकीय विभागाअंतर्गत त्या त्या शाळेत जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे.