शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ जानेवारी) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भोसरी येथील प्रभाग क्र. ६ मधील आरक्षण क्र. ४३२, मार्केट इमारत बांधणे या कामाचे भूमिपूजन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, प्रभाग अध्यक्ष राजेंद्र लांडगे, नगरसदस्या सारिका लांडगे, यशोदा बोइनवाड, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप,सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement