सावंतनगर मधिल बाजीराव शिंदे यांचे घर अचानक लागलेल्या आगीत जळुन खाक
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ जानेवारी) :- गवळीनगर प्रभागातील सावंतनगर येथील बाजीराव शिंदे यांच्या घराला २५ जानेवारी रोजी रात्री बारा – एक च्या सुमारास अचानक घरात आग लागली.
शिंदेआजी या मतिमंद असल्याने त्यांनी घरामध्ये आजूबाजूच्या परिसरातील कचरा भरमसाठ प्रमाणात जमा करून ठेवला होता.थंडीचे दिवस असल्याने घरात त्यांनी शेकोटी पेटवली आणि याच शेकोटीच्या माध्यमातून घरात आग लागली.घरातील प्रत्येक वस्तू या आगीत जळून खाक झाली आहे. अशा परिस्थितीत आगीचे लोळ बाहेर पडण्यासाठी नागरिकांना घराचे पत्रे तोडावे लागले. दरवाजाही आगीत जळून खाक झाला आहे. घरात लाईट कनेक्शन व सिलेंडर नसल्याने सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.
यावेळी नगरसेविका प्रियांका प्रविण बारसे यांनी या कुटुंबाला मदतीचा हात पुढे केला आहे.
आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांनी घरात झालेला कच-याच्या माध्यमातून झालेला आगीत कोळसा झालेला सर्व राडारोडा उचलून घेण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच त्यांचे घराचे तुटलेले पत्रे व दरवाजा यांना बसून देण्याचेही काम हाती घेतले .
खरतर या निवडणुकीच्या काळात फक्त मतदारांवर लक्ष केंद्रित करणारे उमेदवार आपल्याला दिसून येतात. पण प्रियांका बारसे यांनी हे आपले मतदार नाहीत हे माहीत असूनही माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे केला आणि त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन समाजाला घडवून दिले.गेली चार दिवसापासून आजूबाजूच्या शेजारच्या लोकांनी या कुटुंबाला अन्न,वस्त्र तसेच झोपण्यासाठी आवश्यक असलेले चादर बेडशीट त्यांना पुरविले त्याबद्दल नगरसेविका बारसे यांनी या सर्व शेजारधर्म पाळलेल्या नागरिकांचे आभार मानले आहेत. तर बाजीराव शिंदे यांनीदेखिल नगरसेविका प्रियांका बारसे यांचे आभार मानले.