शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ जानेवारी) :- उत्तर प्रदेशची निवडणूक होत असताना या निवडणुकीची चर्चा संपूर्ण देशात होत आहे. योगी सरकार परत एकदा सत्ता काबीज करणार की भाजपला सत्ता गमवावी लागणार याबाबतच्या चर्चांना मोठ्याप्रमाणावर उधाण आले आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत शिवसेनाही मोठ्या ताकदीने ही निवडणूक लढविणार आहे. उत्तर प्रदेश मध्ये आपले उमेदवार निवडून यावे याकरिता शिवसेना वतीने नियोजन बद्ध योजना आखण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेचे संघटक आकाश चतुर्वेदी यांच्यावर शिवसेनेने मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांना उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये मथुरा येथील सहा विधानसभा क्षेत्रात प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. या जबाबदारीचे आपण सोने करून उत्तर प्रदेश मध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील यासाठी मनापासून प्रयत्न करणार असून वरिष्ठांनी दाखविलेल्या विश्वासाला आपण सार्थ ठरविणार आहोत असे यावेळी आकाश चतुर्वेदी यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून ही मोठी जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडणार अशी ग्वाही यावेळी आकाश चतुर्वेदी यांनी दिली.